नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! सरकारने 01 जुलै 2025 (pik vima yojana starting July 2025) पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana – PMFBY) पुन्हा या वर्षी सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड आणि रोगांमुळे झालेल्या नुकसानाचा विमा संरक्षण देत आहे. तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, कोण अर्ज करू शकतो, पिक विमा अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, विमा हप्ता किती याची सर्व माहिती या पोस्ट मध्ये देणार आहेत तर चला पाहूया.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
- 2025 खरीप हंगामासाठी लागू
- विमा हप्ता अत्यल्प दरात (2% ते 5%)
- पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई थेट बँक खात्यात
- ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा
- सर्वाना बंधनकारक नाही (स्वेच्छेने सहभाग)
या योजनासाठी कोण अर्ज करू शकतो? (पात्रता)
ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन आहे किंवा कर्ज घेतले आहे. जे शेतकरी कोणत्याही बँकेच्या माध्यमातून शेतीकर्ज घेतात (कर्जदार शेतकरी ), बिगर कर्जदार शेतकरी (स्वेच्छेने सहभाग).
महत्त्वाच्या तारखा (खरीप हंगाम 2025):
घटक | तारीख |
---|---|
योजना सुरू | 01 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | (अपेक्षित) |
हप्ता भरण्याची अंतिम तारीख | (अपेक्षित) |
पिक विमा अर्ज प्रक्रिया – Step by Step
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
- pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- “Farmer Corner” टॅब मध्ये जा
- नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा हे सिलेक्ट करा
- आपल्या शेतीचा तपशील भरा जसे कि तालुका, गाव, गट नंबर, पीक इ.
- विमा कंपनी निवडा
- जे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- विमा हप्ता भरून अर्ज सबमिट करा
- अर्जाची प्रिंट किंवा रिसिप्ट जतन करा
सरकारी योजना व्हाट्सअँप ग्रुप join करा: नवनवीन सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्स मिळवा मोबाईलवर! Free Sarkari Yojana WhatsApp Group Link 2025
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया: pik vima yojana starting July 2025
आपल्या बँकेत, सेतू केंद्रात, महा-ई सेवा केंद्रात (CSC), किंवा कृषी विभागात जाऊन अर्ज भरता येतो
बँक कर्मचारी तुमच्याकडून कागदपत्रे घेऊन अर्ज करतील याची पोचपावती घ्या
आवश्यक कागदपत्रे (Documents Required):
कागदपत्र | तपशील |
---|---|
आधार कार्ड | ओळख सिद्ध करण्यासाठी |
7/12 उतारा | जमीन मालकी दर्शविण्यासाठी |
बँक पासबुक | खात्याची माहिती (DBT साठी) |
मोबाईल नंबर | OTP व संपर्कासाठी |
शेती कर्ज प्रमाणपत्र (लागल्यास) | कर्जदार शेतकरी असल्यास |
पिकाचा तपशील | कोणते पीक घेतले आहे याचा उल्लेख |
हे वाचा: सरकारी योजना list 2025 सर्व योजना एकाच ठिकाणी Sarkari Yojana in Maharashtra 2025

विमा हप्ता किती? pik vima yojana starting July 2025
पीक प्रकार | हप्ता दर |
---|---|
खरीप पिके | 2% विमा रक्कम |
रब्बी पिके | 1.5% विमा रक्कम |
व्यापारी/नगदी पिके | 5% विमा रक्कम |
पीक विमा कधी मिळतो ?
- अवकाळी पाऊस
- गारपीट / वादळ
- कीड व रोग
- दुष्काळ / अतिवृष्टी
- पीक उगम न होणे / उगवणीनंतर नाश
विमा कंपन्या – 2025 साठी
- Agriculture Insurance Company of India (AIC)
- Reliance General Insurance
- IFFCO Tokio
- SBI General Insurance
- Bajaj Allianz
- (जिल्हानिहाय विमा कंपनी बदलू शकते)
महत्त्वाचे मुद्दे: pik vima yojana starting July 2025
विमा घेताना नावावरची जमीन असावी किंवा योग्य कर्ज खातं असावं
अर्ज करताना पिक व शेती माहिती अचूक भरा
ऑनलाइन अर्जाची प्रिंट/स्क्रीनशॉट जतन करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1: पिक विमा साठी कर्ज आवश्यक आहे का?
➡️ नाही. बिगर कर्जदार शेतकरी देखील विमा घेऊ शकतात. आणि कर्जदार शेतकरी देखील विमा घेऊ शकतात.
Q2: अर्ज कसा ट्रॅक करावा?
➡️ pmfby.gov.in वर लॉगिन करून अर्ज स्थिती पाहता येते.
Q3: नुकसान झाल्यावर भरपाई कधी मिळते?
➡️ नुकसान पडताळणी आणि अहवालानंतर 2-3 महिन्यांत रक्कम थेट खात्यात जमा होते.
Q4: विमा घेतल्याचे प्रमाणपत्र मिळेल का?
➡️ हो, ऑनलाइन अर्ज केल्यास तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता. किंवा तुमची पावती जतन करून ठेवा.
सरकारी योजना व्हाट्सअँप ग्रुप join करा: नवनवीन सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्स मिळवा मोबाईलवर! Free Sarkari Yojana WhatsApp Group Link 2025
शेवटचं सांगायचं म्हणजे:
01 जुलै 2025 पासून सुरू होणारी ही योजना प्रत्येक शेतकऱ्याने नक्की घ्यावी. ही योजना तुमचं पीक व उत्पन्न वाचवू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमचं शेती भविष्य सुरक्षित करा.
- तुमचा अर्ज मंजूर झाला तपासा लगेच! Testmmmlby Mahaitgov In Status 2025
- ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर! News WhatsApp Group Link free 2025
- प्रधानमंत्री योजना व्हाट्सअॅप ग्रुप 2025 |PM Yojana WhatsApp Group Link
- पोखरा योजना महाराष्ट्र 100% अनुदान संपूर्ण माहिती! Pokhara Yojana Maharashtra
- नकली बियाण्यांपासून सावध! खरेदीपूर्वी तपासा नाहीतर होईल मोठं नुकसान! Kharip Perni Biyane 2025
2 thoughts on “पिक विम्यासाठी अर्ज 01 जुलै 2025 पासून सुरू | pik vima yojana starting July 2025”