नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! शेतकरी हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे. पण अनेकदा सरकारी योजना, सुविधा आणि अनुदान त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने “पोखरा योजना” (Pokhara Yojana Maharashtra) राबवली आहे. ही योजना “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प” अंतर्गत आहे.
त्यामुळे हि योजना काय आहे? त्याचा लाभ आपण कसा घेऊ? त्यासाठी पात्रता काय? कोणते कागदपत्रे लागतील? कसा अर्ज भाराचा? हे सर्व प्रश्न त्यांना येत असतील. त्यामुळेच सर्व शेतकरी बांधवांना विंनंती आहे कि, या पोस्ट ची लिंक जास्तीत जास्त ग्रुप ला पाठवा. जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना नवीन योजनेविषयी माहिती मिळेल. तर चला आपण Pokhara Yojana Maharashtra नेमकी काय आहे आणि 100% अनुदान कसे मिळेल या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

पोखरा योजना म्हणजे काय? पोखरा योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती – Pokhara Yojana Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आनंदी राहिले तरच राज्याचा आणि भारताचा होईल. म्हणून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याकरिता सरकारने Pokhara Yojana Maharashtra उर्फ नानाजी देशमुख कृषी संजीवनी राबविण्याचा संकल्प केला आहे. हा एक सरकारचा एक मोठा उपक्रम देखील म्हणला जातो. कारण नाव नवीन तंत्रज्ञान अमलात आणू शेतीचा विकास करण्यास चालना देण्याचे काम पोखरा योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून चालू आहे.
अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा
पोखरा योजना ही शेतकऱ्यांना शेतीसाठी पूरक प्रकल्पांवर अनुदान देणारी योजना आहे. यामध्ये फळबाग लागवड, पोलिहाऊस, कुकुटपालन, मधमाशी पालन, शेततळे, ड्रिप सिंचन, माती बंधारे, बियाणे प्रक्रिया उपकरणे इत्यादींचा समावेश होतो.
शेतकऱ्याचे परंपरागत पीक सोडून जे महाग आणि जास्त उत्पन्न करून देऊ शकतात अशा पिकांना वाव देऊन त्याकरिता शेतकरयांना मदत सरकारच करणार आहे. सोबतच महाडीबीटी पोखरा योजना चा फॉर्म भारत तर 100% अनुदान देखील प्राप्त होणार आहे. परंतु हि माहिती बहुतांश शेतकऱ्यांना माहीतच नसल्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करत आहेत. तर चला बघू पोखरा योजनेतून कोणते कोणते मिळणार लाभ.
योजनेतील प्रमुख लाभ: Pokhara Yojana
🔹 क्षेत्र | 🔸 लाभ |
---|---|
फळबाग, भाजीपाला शेती | लागवड, साहित्यावर 100% अनुदान |
पशुपालन / कुकुटपालन | शेड व साहित्यावर सहाय्य |
शेततळे / विहीर | जलसाठा वाढवणारे प्रकल्प |
सेंद्रिय खत / गांडूळ खत | उत्पादन युनिटसाठी मदत |
पॉली हाऊस / नेट हाऊस | संरक्षित शेतीसाठी पूर्ण सहाय्य |
सिंचन प्रणाली | ठिंबक व तुषार अनुदान |
बांबू लागवड | वनशेतीला प्रोत्साहन |
बियाणे यंत्रणा | साठवण, सुकवणी यार्ड, गोदाम |
गाई पालन योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा मार्ग! New Gai palan yojana maharashtra 2025

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ विशिष्ट जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे.
1 | अमरावती |
2 | अकोला |
3 | वाशीम |
4 | यवतमाळ |
5 | बुलढाणा |
6 | वर्धा |
7 | हिंगोली |
8 | बीड |
9 | परभणी |
10 | नांदेड |
11 | लातूर |
12 | जालना |
13 | उस्मानाबाद |
14 | जळगाव |
15 | इत्यादी. |
पात्रता (Eligibility): Pokhara Yojana
- अर्जदार हा महाराष्ट्रातील निवासी असला पाहिजे
- स्वतःच्या नावावर शेतीचा सातबारा असला पाहिजे
- आधार कार्ड, बँक खाते (DBT साठी लिंक), मोबाईल क्रमांक आवश्यक
- अर्जदार त्या जिल्ह्यातील असावा, जिथे योजना लागू आहे
- कोणतीही वयोमर्यादा नाही
अर्ज करा पिक विम्यासाठी 01 जुलै 2025 पासून सुरू | pik vima yojana starting July 2025
आवश्यक कागदपत्रे:

- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक
- पॅन कार्ड
- जमीन नोंदणीचा पुरावा
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
- mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या
- नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा
- “पोखरा योजना” विभाग निवडा
- आपली संपूर्ण माहिती भरून अर्ज सादर करा
- अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट ठेवा
सरकारी योजना list 2025 सर्व योजना एकाच ठिकाणी Sarkari Yojana in Maharashtra 2025
निष्कर्ष: Pokhara Yojana
पोखरा योजना महाराष्ट्र ही केवळ अनुदान योजना नसून ती शेतकऱ्याला व्यवसायात रूपांतरित करण्याचा मोठा टप्पा आहे. उत्पादनासोबत उत्पन्नही वाढवा. जिच्या माध्यमातून सरकार हे १०० % अनुदान देऊन राज्यातील शेतकऱ्यांना व्यवसायासाठी साठी मदत करत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती सोबत एक अधिक उत्पनाचा सोर्स बनवता येणार आहे.

योजनेमार्फ़त कुठल्या व्यवसायासाठी अनुदान दिले जाते आणि कुठल्या शेतीच्या कामाकरीता मदत दिली जाती आहे हे आपण बघितलेच आहे. सोबतच योजनेचा अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा घ्याचा याविषयी सुद्धा विस्तारित माहिती बघितली आहे. अशाच सरकारच्या नवीन नवीन योजनांचा लाभ घेण्याकरिता येणाऱ्या नोटिफिकेशन ” होय” उत्तर द्यायला विसरू नका, धन्यवाद.